प्लास्टिकरुपी कचरा. छायाचित्र : संग्रहित मुंबई : पर्यावरणाचे रक्षण करायचे म्हटले की यासाठी आधी समस्या शोधून त्यावर उपाय करणे आवश्यक आहे....
प्लास्टिकरुपी कचरा. छायाचित्र : संग्रहित
मुंबई :
पर्यावरणाचे रक्षण करायचे म्हटले की यासाठी आधी समस्या शोधून त्यावर उपाय करणे आवश्यक आहे. जगाला या समस्या माहीत नाहीत असेही नाही. समस्या माहीत आहेत. मात्र, यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले तर कोट्यवधीचे नुकसान होईल ना.. मग कशाला त्या भानगडीत पडायचे असे म्हणून फक्त समस्या आहेत. त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करू असे सांगून वेळ मारून नेण्याचे काम जगातील अनेक देश, कंपन्या करत आहेत.
असे असले तरी खासगी क्षेत्रात अशाही काही कंपन्या आहेत की ज्यांनी पर्यावरणाच्या रक्षणाचा विचार केला आहे. भारतातील रिलायन्स इंडस्ट्रीज या कंपनीने पर्यावरणाच्या हिताचा निर्णय घेतला आहे. कंपनीने म्हटले आहे की, कंपनी आता प्लास्टिक बॉटल रिसायकल करण्याच्या आपल्या क्षमतेत दुपटीने वाढ करणार आहे. यामुळे कोट्यवधी प्लास्टिक बॉटल झटक्यात नष्ट होणार आहेत. या योजनेसाठी प्लास्टिक रिसायकलिंग आणि कचरा व्यवस्थापन कंपनी Srichakra Ecotex India Pvt Ltd तयार करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त आंध्र प्रदेशमध्ये एक नवा प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. येथे प्लास्टिक बॉटल रिसायकल करण्यासाठी पॉलिएस्टर स्टेपल फायबर तयार केले जाणार आहे.
प्लास्टिक बॉटल रिसायकल करण्याच्या क्षमतेत दुपटीपेक्षा जास्त वाढ करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे जेणेकरून वापर केलेल्या तब्बल 500 कोटी प्लास्टिक बॉटल रिसायकल करता येतील. एका रिपोर्टनुसार कंपनीच्या या निर्णयामुळे 90 टक्क्यांपेक्षा जास्त प्लास्टिक बॉटल रिसायकल करता येतील.
दरम्यान, सिंगल यूज प्लास्टिकने पर्यावरणाचे मोठे नुकसान केले आहे. सिंगल यूज प्लास्टिकमुळे मोठ्या शहरात जलभरावाची समस्या कायम उद्भवत आहे. तसेच हे प्लास्टिक मानवी आरोग्यस घातक सिद्ध होत आहे. कितीतरी प्रयत्न केले मात्र अजूनही या प्लास्टिकला हद्दपार करता आलेले नाही. आता तर याचा वापर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. त्यामुळे समस्या मिटणार तरी कशी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
जगातील मोठ्या देशांकडून प्लास्टिक तयार करणाऱ्या कंपन्यांना भरघोस आर्थिक मदत दिली जाते. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे, जगभरात तयार होणाऱ्या या सिंगल यूज प्लास्टिकचा ९० टक्के कचरा फक्त १०० कंपन्यांद्वारे केला जात आहे. तर दुसरीकडे जगातील निम्म्यापेक्षा जास्त कचरा फक्त २० कंपन्यांद्वारे तयार होत असल्याचे समोर आले आहे. या कंपन्या पेट्रो केमिकलशी संबंधित आहेत. यामध्ये अमेरिका आणि चीनच्या कंपन्यांचा समावेश आहे. स्टॉकहोम एनवायर्नमेंट इंन्स्टिट्यूट आणि मिंडेरू फाऊंडेशनने याबाबत अभ्यास करत यातील कार्पोरेट नेटवर्कचीही चौकशी केली.
COMMENTS