सेवानिवृत्त जवान सतीश गेरंगे यांचे इसळक – निंबळक ग्रामस्थांच्या वतीने भव्य स्वागत! सेवानिवृत्त जवान सतीश गेरंगे यांचा इसळक-निंबळक ग्रामस्था...
सेवानिवृत्त जवान सतीश गेरंगे यांचे इसळक – निंबळक ग्रामस्थांच्या वतीने भव्य स्वागत!
लष्करी सैन्यदलातील जवान आपल्या कुटुंब आणि गावापासून लांब राहून देशाच्या सीमांचे रक्षण करतात. युद्धाच्या किंवा आपत्कालीन परिस्थितीमध्ये स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नागरिकांचे रक्षण करतात. त्यामुळे प्रत्येक जवानाचा सन्मान करणे, आदर करणे हे आपले कर्तव्यच आहे, असे मत माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक भानुदास कोतकर यांनी व्यक्त केले.
सेवानिवृत्त जवान सतीश शिवाजी गेरंगे यांनी भारतीय सैन्यदलातील तब्बल २२ वर्षांची सेवा पूर्ण केली. त्यांच्या सेवापूर्तीनिमित्त ग्रामस्थांनी त्यांच्या स्वागत मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. दत्त मंदिर चौकात जवान गेरंगे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. ग्रामस्थ स्वयंस्फूर्तीने या मिरवणुकीत सहभागी झाले. महिलांनी ठिकठिकाणी जवान सतीश गेरंगे यांचे औक्षण केले.
श्री. कोतकर पुढे म्हणाले की, जवान सतीश गेरंगे यांच्या स्वागत समारंभाबद्दल कार्यक्रम आयोजित करून नव्या पिढीसमोर आदर्श उभा केला आहे. हा पायंडा यापुढेही असाच चालू राहायला हवा.
या कार्यक्रमप्रसंगी युवा नेते अजय लामखडे, उपसरपंच बाळासाहेब कोतकर, भाऊसाहेब गायकवाड, इसळकचे सरपंच संजय गेरंगे, सेवा संस्थेचे चेअरमन पोपट खामकर, उद्योजक पोपट तांबे, मच्छिंद्र म्हस्के, अॅड. योगेश गेरंगे, संदीप कळसे, माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक वृंद आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेतकरी संघटनेचे नेते संदीप गेरंगे यांनी आभार मानले. तर बाळासाहेब माधव कोतकर यांनी सूत्रसंचालन केले.
सन्मान आणि सत्काराने भारावून गेलो : सेवानिवृत्त जवान गेरंगे
सेवापूर्तीनिमित्त ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या सत्काराला उत्तर देतांना जवान सतीश गेरंगे म्हणाले की, ‘अनपेक्षितपणे हा सुखद धक्का मिळाला आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये लष्करात सेवा केली आहे. मात्र, आजच्या सन्मान आणि सत्काराचे हे भव्य रूप पाहून केलेला त्याग आणि सेवा सार्थकी लागला आहे, अशी भावना व्यक्त केली. हा सन्मान सोहळा पाहून भारावून गेलो असल्याचे सांगताना त्यांचा कंठ दाटून आला.
आ. लंकेची उशिराने एंट्री; शिवरस्त्याबाबत तात्काळ बैठकीच्या सूचना
आ. नीलेश लंके यांनी गेरंगे कुटुंबियांच्या निवास्थानी भेट देत शुभेच्छा दिल्या. |
COMMENTS