माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्या नावाने फिरणारा खोटा मेसेज. प्रतिनिधी : भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी. जे. अब्दुल कलाम यांच्या च...
माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्या नावाने फिरणारा खोटा मेसेज. |
प्रतिनिधी :
भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी. जे. अब्दुल कलाम यांच्या चित्रासह एक कथित विधान सोशल मीडियातून मोठ्याप्रमाणावर व्हायरल होत आहे. त्यात लिहिले आहे, "मुसलमान जन्माने दहशतवादी नसतात. त्यांना मदरशांमध्ये कुराण शिकवले जाते, त्यानुसार ते हिंदू, बौद्ध, शीख, ख्रिश्चन, ज्यू आणि इतर बिगर मुस्लिमांची निवडकपणे हत्या करतात. दहशतवादावर नियंत्रण ठेवण्यासाठी भारतात चालणाऱ्या हजारो मदरशांवर बंदी घालणे अत्यंत आवश्यक आहे.’ या गोष्टी अब्दुल कलाम यांनी सांगितल्याचा दावा केला जातो.
माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्या नावाने फिरणारा खोटा मेसेज. हे कुठल्यातरी वृत्तपत्राचे कात्रण असल्याचे भासवले जात आहे. |
https://twitter.com/AltNewsHindi/status/1435572456362758148?s=20
सत्य पडताळणी :
हा संदेश सोशल मीडियावर अनेक वर्षांपासून डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्या चित्रासह शेअर केला जात आहे. 2 वर्षांपूर्वी ते 'शेअर चॅट' वर डॉ. कलाम यांच्या वेगळ्या चित्रासह शेअर केले होते. ऑल्ट न्यूजला 2014 च्या ब्लॉग पोस्टमध्ये या कथित विधानाचे सर्वात जुने उदाहरण सापडले. हा ब्लॉग संजय तिवारी नामक व्यक्ती चालवतो. जो स्वतःला उजाला न्यूज नेटवर्कचा संस्थापक म्हणून मिरवत आहे. त्याचे ट्विटर हँडल बघितल्यावर कळते की, ते प्रधानमंत्री मोदींचे समर्थक आहेत. तर अरविंद केजरीवाल यांच्यासाठी सातत्याने अपशब्द वापरतात.
या विधानाशी संबंधित बातम्या शोधण्याचा प्रयत्न केला परंतु, अशा कोणत्याही बातम्या सापडल्या नाहीत. कलाम यांनी असे वादग्रस्त वक्तव्य करणे अशक्य आहे आणि प्रसारमाध्यमांनी त्याबाबत अहवाल दिलेला नाही. म्हणजेच वर्षानुवर्षे हे विधान इंटरनेटवर कलामांचे म्हणून फिरत आहे.
https://twitter.com/QuintFactCheck/status/1436139864177590290?s=20
कुटुंबानेही त्याला खोटा मेसेज म्हटले आहे.
या चित्राची सत्यता जाणून घेण्यासाठी, ऑल्ट न्यूजच्या प्रतिनिधींनी (Alt News) एपीजे एम जे शेख सलीम यांना संपर्कात केला. सलीम हे अब्दुल कलाम यांचे पुतणे आहेत. ते अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन (AKIF) चे व्यवस्थापकीय विश्वस्त देखील आहेत. ते म्हणाले, ‘एपीजे अब्दुल कलाम यांनी असे कोणतेही विधान केले नाही. त्यांनी कधीही कोणत्याही धर्माशी संबंधित कोणतीही टिप्पणी केली नाही’.
म्हणजेच वर्षानुवर्षे एपीजे अब्दुल कलाम यांच्या नावाचा गैरवापर करून सोशल मीडियावर जातीयद्वेष पसरवणारा, सामाजिक शांतता भंग करण्यास प्रवृत्त करणारा धादांत खोटा मेसेज पसरविला जात आहे.
COMMENTS